नाशिक परिसरातील तमाम ट्रेकर्स मंडळींनी पुढाकार घेऊन " सह्याद्री मित्र संमेलन नाशिक २०२३ " आयोजित केले होते. यंदा हे २ रे वर्ष आहे. कै. जोशीकाकांच्या स्मृतींना उजाळा देणे व त्यानिमित्त विविध कार्यक्रम व पुरस्कार आयोजित करणे हा या समितीचा मुळ उद्देश. नाशिककरांबरोबरचं महाराष्ट्रातील सह्याद्री प्रेमी, निसर्गप्रेमी, सायकलिस्ट व ट्रेकर मंडळी यांना सामावून घेण्याचं स्वप्न बघून आम्ही ह्या कार्यक्रमाच्या दुसऱ्या वर्षात पदार्पण करत आहोत. सह्याद्रीत भटकणा-यांसाठी आपलं स्वतःचं व्यासपीठ असावं. त्यावर आपल्या आपल्या कलागुणांना सादर करण्याची संधी मिळावी आणि वर्षातून एकदा तरी आपण सर्व भटक्यांनी एकत्र यावं. भेटी गाठी व्हाव्यातआणि सह्याद्री जागर व्हावा.
यासाठीचं..हे सह्याद्री मित्र संमेलन..

सह्याद्री मित्र संमेलन - १ ले याविषयी थोडक्यात

कै.अविनाश जोशी काका (नाशिक) यांच्या जन्मदिनी अर्थात ७ जुलै या तारखेला "सह्याद्री रत्न" पुरस्कार देण्याचे आयोजिले होते. हा पहिला पुरस्कार गिर्यारोहणातील ऋषितुल्य व्यक्तिमत्व श्री. हरिश कपाडिया सर ह्यांना देण्यात आला. त्यांना सह्याद्रीप्रती असलेली माहिती, त्यांचे भटकणे, लिखाण, फोटोग्राफी, भौगोलिक ज्ञान, इतिहास याबाबत त्यांची सजगता अधिक अधोरेखित असावी. अर्थात समाजासमोर सर्व प्रकारे व्यक्त होणे महत्वाचे. सह्याद्रीमध्ये सातत्याने भटकणे जितके अवघड तितकेच सोपेही! पण ते भटकणे आखीव-रेखीव असेल, लिखित असेल, लोकोपयोगी असेल तर ती भटकंती खऱ्या अर्थाने श्रीमंत म्हणता येईल. याचाच अर्थ तुम्ही भटकता तर त्याचा उपयोग इतरांनाही व्हायला हवा. त्यामुळे तुमची भटकंती अधिक प्रगल्भ, सर्जनशील आणि परिपक्व होत जाते. तुमचे लिखित हे खऱ्या माहितीच्या आधारे असावे, अश्या परिपक्व व्यक्तीला म्हणजेच श्री.हरिश कपाडिया सर ह्यांना 'सह्याद्री रत्न' पुरस्कार देण्यात आला.

सह्याद्री मित्र संमेलन २०२४

वर्ष २ रे

रविवार, दिनांक ३० जून रविवार २०२४
वेळ
वेळ : सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत

कार्यक्रमाचे ठिकाण : गुरूदक्षिणा Auditorium, गोखले एज्युकेशन काॅलेज कॅम्पस, कॉलेज रोड, नाशिक.


• वर्ष २०२३, जुलै ७ रोजी


सह्याद्री मित्र संमेलन चं पहिलं वर्षं होतं. कालीदास कलामंदिर नाशिक येथे पार पडलेल्या अभुतपुर्व कार्यक्रमास नाशिक सह महाराष्ट्रातील तमाम सह्याद्री प्रेमींनी प्रचंड प्रतिसाद दिला.

अर्धा दिवसाचे हे संमेलन दुपारी ठिक ४ वाजता सुरू झाले. सुरूवातीला नाशिकच्या सिंहगर्जना ढोल पथकाने संमेलनाची सुरुवातचं धुमधडाक्यात केली. त्यामुळे सभागृहात उत्साहाचे वातावरण तयार झाले. नाशिकचा हरहुन्नरी ढोलवादक प्रितम भामरे याने दिलेली गारद अचाट होती, त्यानंतर एक्सपालियर शाळेच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र गीत समुहाने गात सभागृहातील सह्याद्री प्रेमींना भारावून टाकले.त्यानंतर किर्ती भवाळकर शिष्यांनी शिवरायांच्या आरतीला नृत्य साज चढवत कार्यक्रम उंचीवर नेऊन ठेवला. निवेदक म्हणून नाशिकचे साहित्य क्षेत्रातील आघाडीचे स्वानंद बेदरकर यांनी काम बघितले.

नंतर संमेलनाचे अध्यक्ष रंगराव आण्णा पाटील, प्रमुख पाहुणे आनंद पाळंदे, जेष्ठ गिर्यारोहक श्रीमती उषा:प्रभा पागे आणि सह्याद्री रत्न पुरस्कारार्थी श्री.हरिश कपाडिया सर यांच्या हस्ते दिपप्रज्वलन झाले.

तद्नंतर संमेलनाची प्रस्तावना डॉ.सुधीर संकलेचा यांनी केली. श्री. हरिश कापडिया सरांनी ओळख डॉ. सुनील वर्तक यांनी केली तर आनंद पाळंदे सरांची ओळख डॉ .अमर आडके सरांनी करून दिली.

ज्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ हे संमेलन आयोजित करण्यात आले त्या कै.अविनाश जोशी यांच्या जिवन पटावर आधारित १५ मिनिटांची फिल्म दाखविण्यात आली. नंतर कै.जोशीकाकांचे जिवलग ट्रेकर मित्रांचा सन्मान करण्यात आला. शांताराम रायते, अतुल अग्रवाल, घनश्याम वर्मा, संजय कुलकर्णी.

पुरस्कार वाटप व स्पर्धा विजेते यांचा सन्मान सुरू झाला.. प्रथम विशेष उल्लेखनीय कामगिरी पुरस्कार डॉ. हितेंद्र व डॉ. महेंद्र महाजन यांना आत्माराम परब हस्ते प्रदान करण्यात आला.

चक्रम हायकर्स मुलुंड मुंबई सुरेद्र शेळके हस्ते व नाशिकच्या क्लाईंबर्स व रेस्कू टिमचा विशेष उल्लेखनीय कामगिरी पुरस्काराने दिलिप निंबाळकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

त्यानंतर सह्याद्री रत्न या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. गिरीदुर्ग संस्थेच्या सदस्यांनी पालखीत पुस्तक आणून सर्वांना आश्चर्य धक्का दिला. ग्रंथदिंडी स्वरुप.संपादक सदस्य म्हणून विनायक वाडेकर उपस्थित होते.ट्रेकिंग हब ऑफ इंडिया डिजिटल फलक अनावरण मधुमती सरदेसाई यांच्या हस्ते करण्यात आलेस्वप्निल पवार निर्मित राजगड फिल्म दाखविण्यात आलीं

नंतर ..ब्लॉगर ऑफ द इयर.. प्रांजल वाघ ..लिमये सर फोटोग्राफर ऑफ द इयर.. संग्राम गोवर्धने ..बिभास अमोणकर ' मोबाईल फोटोग्राफर.. पृथ्वीराज शिंदे ..पाळंदे काका ट्रेकर ऑफ द इयर.. नितिन मोरे .. हरिष कपाडीया बहुआयामी ट्रेकर.. दिलीप वाटवे .. राजेश गाडगीळ रेस्क्यू टिम ऑफ द.. शिवदुर्ग लोणावळा ..प्रिती पटेल दुर्गसंवर्धन टीम ऑफ द इयर..बा रायगड संस्था.. उषाताई पागे वाटाड्या ऑफ द इयर..कमळू पोकळा..चारूहास जोशी

सह्याद्री रत्न पुरस्कार आनंद पाळंदे यांच्या हस्ते प्रदान…हरिश कपाडिया

असे विविध पुरस्कार व स्पर्धा विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. सरते शेवटी नामवंत गिर्यारोहक श्री. हरिश कपाडिया सरांचे सह्याद्री भटकंती वर बहुउपयोगी भाषण पार पडले.सर्व उपस्थित सह्याद्री प्रेमी आनंदाचे भाव व आठवणी घेऊन परतीला गेले.

गीता पाटील हिने आभार मानले नी शेवटी राष्ट्रगीताने संमेलनाची सांगता करण्यात आली.


Back to top