रील मेकिंग स्पर्धा


रील मेकिंग स्पर्धा नियम आणि अटी

पात्रता:

स्पर्धा सर्व वयोगटातील आणि कोणत्याही अनुभवाच्या स्तरावरील निर्मात्यांसाठी खुली आहे.

बक्षिस:

प्रथम पारितोषिक :

₹ 5000 आणि सन्मानचिन्ह

द्वितीय पारितोषिक :

₹ 3000 आणि सन्मानचिन्ह

तृतीय पारितोषिक :

₹ 2000 आणि सन्मानचिन्ह

सबमिशन:

१) आपण बनवलेली रील इंस्टाग्राम वर अपलोड करणे बंधनकारक आहे.
२) अपलोड करताना पुढील 4 हॅशटॅग वापरणे बंधनकारक आहे. #sahyadri_mitra_sammelan #nashik_the_trekking_hub_of_bharat #sahyadri_ratna #sahyadri_mitra_2024 ह्याच्यापुढे तुम्ही कितीही हॅशटॅग्स वापरू शकता.
३) sahyadri_ratna ह्या इंस्टाग्राम पेज ला Collaboration असणे बंधनकारक आहे.
४) एक स्पर्धक किमान दोन रील अपलोड करू शकतो , मात्र प्रवेश फॉर्म दोन वेळा भरणे आवश्यक आहे.
५) प्रवेश फॉर्म लिंक



अंतिम मुदत:

* १५ जून २०२४.
* उशिरा आलेल्या नोंदी स्वीकारल्या जाणार नाहीत.


रिल्स ड्युरेशन:

स्पर्धेसाठी सादर केलेल्या रिल्सच्या लांबी ३० ते ९० सेकंदाच्या आत बसवावी. (३० सेकंदाच्या खालील रिल्स ग्राह्य धरल्या जाणार नाहीत)


ओरिजनल:

१) रिल्स हि सबमिट करणाऱ्या निर्मात्याने तयार केलेले मूळ कार्य असले पाहिजेत.
२) रिल्समध्ये वापरलेली कोणतीही कॉपीराइट केलेली सामग्री योग्यरित्या परवानाकृत आणि क्रेडिट केलेली असणे आवश्यक आहे.
३) रिल्स ह्या आधी कोणत्याही स्पर्धेत भाग घेतलेली नसावी अथवा कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर अपलोड केलेली नसावी.


कॉन्टेन्ट गाईडलाईन:

१) रिल्स केवळ सह्याद्री ह्या विषयाशी निगडित असावी. (सह्याद्री हा खूप मोठा विषय आहे त्यामुळे रिल्स बनवणाऱ्यांसाठी विषय निवडीचे मुक्त स्वातंत्र्य आहे.)
२) आक्षेपार्ह किंवा अयोग्य विषयावरील रिल्स रिजेक्ट करण्याची अधिकार परीक्षकांना असतील.


निकष :

१) जास्तीत जास्त Likes, Shares, and Saves ह्याचे ५०% आणि परीक्षक ह्यांचे ५०% गुण एकत्रित करून विजेते घोषित होतील.
२) रिल्स सादरीकरण, प्रोडक्शन क्वालिटी, ओरिजिनॅलिटी, क्रिएटिव्हिटी, टेक्निकल स्किल्स, इम्पॅक्ट, नाविन्यता आणि स्पर्धेच्या थीमशी सुसंगतता या निकषांवर आधारित बेस्ट ३ रिल्स निवडल्या जातील
३) निवडलेल्या रिल्स विजेते संमेलनाच्या २ दिवस आधी जाहीर करण्यात येतील.
४) एंट्री, स्पर्धेच्या नियमांचे पालन करत नसल्यास किंवा कॉपीराइट किंवा इतर कायदेशीर आवश्यकतांचे उल्लंघन करत असल्याचे आढळल्यास त्या अपात्र ठरू शकतात.


अधिकार आणि परवानग्या:

निवडण्यात येणाऱ्या रिल्स सह्याद्रीमित्र संमेलनात प्रदर्शित करण्याचा अधिकार आयोजकांना असेल. तथापि, रिल्स निर्माते त्यांच्या कामाचे कॉपीराइट राखून ठेवतात आणि ते संमेलन झाल्यावर इतरत्र प्रदर्शित करण्यास स्वतंत्र असतील.



Back to top