स्मरणिका म्हणजे त्या संस्थेने कार्यक्रमांसाठी येणाऱ्या खर्चाची काही प्रमाणात केलेली तजवीज. हे जरी खरं असलं तरी आम्ही यावेळी जरा वेगळा विचार केला आहे. तो असा की' ती स्मरणिका वाचनीय स्वरूपाची व्हावी. त्यासाठी योग्य व नामवंत काही नवीन लेखकांची निवड व त्यांचे विषय. त्याचबरोबर स्मरणिकेचे स्वरूप हे टिपिकल दिवाळी अंकासारखे वा स्मरणिकेसारखे नसावे. ते जसे पुस्तकासारखे असावे. जे वाचतांना पुस्तक वाचल्यासारखा फिल यावा.त्याचा आकार, मांडणी व शब्द ठेवणही देखणी असावी आणि फोटोंची मांडणीही लक्षवेधी असावी.
जाहिरातींचा अधिक भडिमार न करता त्या शक्यतो अदृश्य स्वरूपात असतील यासारखी मांडणी असावी. अर्थात स्मरणिकेचं स्वरूप हे आगळेवेगळे पण वाचनीयही असावे, हे जास्त महत्वाचे. ते पुस्तक आपल्या संग्रही असावं असं प्रत्येकाला वाटावं इतकं ते आकर्षक असावं. यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
या स्मरणिकेत नामवंत गिर्यारोहक व लेखक श्री. आनंद पाळंदे, श्री. वसंत वसंत लिमये, श्री. उमेश झिरपे, श्री.अजय ढमढेरे, श्री.मिलिंद पराडकर, Advt.आनंद देशपांडे इ. व इतर अनेक लेखकांचे वाचनीय लेख समाविष्ट करण्यात आले आहेत.