नमस्कार भटक्या मित्रांनो, जर भटकंती हा तुमचा फक्त छंदच नसून एक पॅशन आहे, तुम्हाला तुमच्या नजरेला दिसणारा सह्याद्री शब्दात उतरवता येतोय आणि ह्या अफाट, विराट आणि सर्वांगसुंदर सह्याद्रीचे वर्णन लोकांपर्यंत पोहोचावे अशी तुमची मनापासून इच्छा आहे, तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत "ब्लॉगर ऑफ द इयर स्पर्धा !!" जिथे तुम्ही मांडू शकता तुमच्या मनातल्या भटकंती मोहिमा अगदी तुम्हाला हव्या तश्या!!
ही ब्लॉगिंग स्पर्धा नसून आपले लिखाण, त्यातले बारकावे आणि मांडणीची ठेवण हे तपासून बघण्याची आणि भविष्यात अजून सुकर आणि सुंदर ब्लॉगर म्हणून नावलौकिक मिळवण्याची सुवर्णसंधीच म्हणता येईल. ह्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल ?? तर फार काही नाही...फक्त खाली दिलेली नियमावली फॉलो करायची आणि ह्या स्पर्धेत सहभागी व्हायचे !!
सह्याद्रीतील भटकंती , गिरिभ्रमंती, घाट -वाटा भटकंती, दुर्ग आणि दुर्गभ्रमंती, प्रस्तरारोहण, सह्याद्रीतील मंदिरे व लेणी, दुर्गसंवर्धन, गिर्यारोहणातील सुरक्षा, सह्याद्रीतील जंगल भटकंती व अनुभव.
१ जून २०२३ ते ३१ मे २०२४ या कालावधीतील लिखाण स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाईल.
1. ब्लॉगवरील सर्व लिखाण हे ब्लॉग लेखकाचे स्वत:चेच असणे आवश्यक आहे. लेखन स्वामित्व हक्काबाबत काही वाद असतील तर ते स्पर्धेत दाखल होण्यापूर्वीच जाहीर करणे बंधनकारक आहे. अशा स्वरूपातील लिखाणाचा समावेश स्पर्धेसाठी नाकारण्याचा पूर्ण हक्क आयोजक व परीक्षकांना असेल.
2. प्रत्येक ब्लॉग मध्ये हाय रिझोल्युशन छायाचित्र असावेत. ब्लॉगवरील छायाचित्रे ही जर ब्लॉग लेखकाव्यतिरिक्त दुसऱ्या कोणाची असतील तर तसे “छायाचित्र सौजन्य” नमूद करणे अपेक्षित आहे. असे न करण्याने जर सदर छायाचित्रकाराने त्यावर आक्षेप घेतला, तर त्याची सर्वस्वी जबाबदारी ब्लॉग लेखकाची असेल व स्पर्धेतून ब्लॅाग बाद केला जाऊ शकतो.
3. ब्लॉगवरील लिखाण कोणत्याही धर्माच्या, जातीच्या, समाजाच्या अथवा व्यक्तिगत भावना दुखाविण्याचा प्रयत्न केलेले नसावे. अशा स्वरूपातील लिखाणाचा समावेश स्पर्धेसाठी नाकारण्याचा पूर्ण हक्क आयोजक व परीक्षकांना असेल.
4. एखाद्या ब्लॉगवर जर स्पर्धेच्या विषयांव्यतिरिक्त अन्य विषयांवर पोस्ट असतील तर स्पर्धेच्या विषया संबधित पोस्ट एकत्रित करून त्याची लिंक द्यावी. जेणेकरून परीक्षकांना सोयीस्कर होऊ शकेल
5. विजेत्या ब्लॉगरला रोख रक्कम रुपये अकरा हजार (रु.११,०००) इतकं पारितोषिक दिलं जाईल.
6. परीक्षकांचे निकाल हे अंतिम व बंधनकारक असतील.
भाषा आणि शुद्धलेखन, लिखाणातील सातत्य, छायाचित्र वापरून केलेली विषयाची प्रभावी मांडणी, ब्लॉग साईटचे डिजाईन
.