सह्याद्रीरत्न 2023 मध्ये आयोजित केलेल्या स्पर्धा
अर्थात B/W फोटोग्राफी काळापासून ट्रेकिंगचे फोटो आपल्याला बघायला मिळतात. हल्ली तर डिजिटल युगात या क्षेत्रात कमालीची क्रांती झालेली आपण अनुभवतोय. त्यांत स्मार्ट फोन आल्यामुळे फोटोग्राफीत न भूतो अशी क्रांती झालेली बघतोय.सोबत सोशल मिडियाचा बोलबाला असल्याने फोटोग्राफी सोबत रिल, क्रिएटिव्ह व्हिडिओ, शॉर्ट फिल्म इ.ची प्रचंड क्रेझ निर्माण झाली आहे. त्यामुळे ट्रेकर मंडळींसाठी फोटोग्राफी स्पर्धा ठेवण्याचे नियोजन ठरले आहे.
ब्लॉगर्स ची क्रेझ...
हल्ली स्मार्टफोन हातात असल्याने तुम्हाला हवी ती माहिती काही क्षणांत तुम्हाला मिळू शकते.त्यामुळे पुस्तके वाचण्याचा वा चाळण्याचा काळ पडद्याआड जाऊ पहातोय. मग हवं तेंव्हा आणि हवं तिथं वाचण्याचं साहित्य उपलब्ध हवं. त्यातंन ब्लॉग लिहिण्याची संकल्पना जन्माला आली. आज ब्लॉगर्स ची एक प्रतिभावान पिढी तयार झाली आहे. त्या अनुषंगाने ट्रेकर मंडळीही ब्लॉग लिहू लागली. आपल्या भटकंतीची विस्तृत माहिती तीही अगदी हवे तेवढे फोटो टाकून जगासमोर आणता येऊ शकते.याचं कारणे ट्रेकिंगचे ब्लॉग प्रसिद्धी झोतात आले. म्हणून ब्लॉगर्स ची स्पर्धा घेण्याचे ठरले.
नव्या तत्रज्ञानासह कमीत कमी वेळात जास्तीत जास्त प्रसाराचे माध्यम म्हणजे सोशल मीडिया. सह्याद्री मित्राचे संमेलन आणि त्याचा प्रचार नाही असे होणे नाही. म्हणून आम्ही घेऊन येत आहोत रील स्पर्धा. त्याची तयारी आज पासून केली तरी उत्तमच . सह्याद्री या विषयाशी संबंधित तुमच्या कल्पक बुध्दीला साद घालून बनवा सर्वाउत्तम रील जी अफाट सह्याद्री सौंदर्य सादर करेल
सह्याद्रीच्या अफाट परिघात हल्ली सहसाच्या अनेक लोक खेळांनी उचल खाल्ली आहे. ट्रेकिंग असो वा सह्याद्रीतील विलोभनीय दृश्य, एखादी वॉल व सुळका मोहीम अश्या पद्धतीच्या सह्याद्री ह्या विषयाशी संबंधित प्रगल्भ शक्तीला आव्हान देऊन बनवा एक सर्वोत्तम फिल्म जी अफाट सह्याद्रीचे विविधांगी रूप सादर करेल.