सह्याद्री मित्र फोटोग्राफी स्पर्धा

सह्याद्री अफाट आहे, अथांग आहे, सुंदर आहे. ह्याच सह्याद्री पर्वतरांगेतील सौंदर्य आपल्या अफलातून छायाचित्रातून उलगडून दाखविणे हे या स्पर्धेचे मुख्य ध्येय ! छायाचित्र काढतांना तुम्ही काय साहित्य वापरलेत हे महत्वाचे नाही. तर तुम्ही काय सौंदर्य बघून ते कॅमेऱ्यात बंदिस्त केले ते महत्वाचे.


विभाग १ - डि एस एल आर कॅमेरा फोटोग्राफी

थीम : Man in landscape photography in Sahyadri

विभाग २ - मोबाईल कॅमेरा फोटोग्राफी

थीम : Man in landscape photography in Sahyadri

विभाग ३ - ड्रोन कॅमेरा फोटोग्राफी


DSLR विभाग पारितोषिक

₹ ११,०००/- आणि सन्मानचिन्ह

मोबाईल विभाग पारितोषिक

₹ ५,०००/- आणि सन्मानचिन्ह

ड्रोन विभाग पारितोषिक

₹ ११,०००/- आणि सन्मानचिन्ह

नियम आणि अटी:

१) स्पर्धा सर्व छायाचित्रकारांसाठी खुली आहे.
२) छायाचित्राचा आकार: छायाचित्राची लांबी एका बाजुने कमीतकमी 1080 व जास्तीतजास्त 2160 पिक्सेल असवा.
३) छायचित्र तुम्ही स्वत: काढलेले असावे.
४) छायाचित्र 1 मे 2022 ते 30 मे 2024 ह्या कालावधीत, कुठल्याही वेळी काढलेले असावे.
५) छायाचित्र फक्त सह्याद्री पर्वत रांगेत काढलेले असावे.
६) छायाचित्राचे शिर्षक, छायाचित्र सह्याद्रीत कुठे काढले याचे ठिकाण_ छायाचित्रकाराचे नाव शिर्षकात नमुद करावे. ओके ऊदा.: "छायाचित्राचे शिर्षक, पन्हाळगड_SangramGovardhane" असे.
७) छायाचित्र पुर्नवापराचा अधिकार पुरस्कार समितीकडे राखीव असतील.
८) स्पर्धक जास्तीत जास्त 3 छायाचित्र स्पर्धेसाठी पाठवु शकतो.
९) एक छायाचित्रकार दोन्हीही (मोबाईल/DSLR) विभागात सहभागी होवु शकतो.
१०) स्पर्धेत भाग घेण्यासाठी अंतिम तारीख 30 मे 2024 आहे.
११) खालील मेल आयडी वर फोटो पाठविणे. sahyadriratna7@gmail.com
१२) स्पर्धेसाठी छायाचित्र पाठवताना, मोबाईल व DSLR विभागासाठी स्वतंत्र मेल पाठवावेत.
१३) मेल मधे छायाचित्रकाराचे नाव, पत्ता व फोन नंबर नमूद केलेला असावा.


निकष :

क्रिएटिव्हिटी आणि ओरिजिनॅलिटी, कम्पोजिशन, भावनिक प्रभाव, थीमशी सुसंगतता, कलात्मक गुणवत्ता, स्टोरी टेलिंग, छायाचित्राचा प्रभाव आणि गुणवत्ता, तांत्रिक कौशल्य ह्या निकषांवर विजेते ठरविले जातील ह्याची स्पर्धकांनी नोंद ठेवावी. .



Back to top