सह्यमित्र फाउंडेशन

सह्याद्रीमित्र डॉक्युमेंटरी स्पर्धा/ शॉर्ट फिल्म 2025

Main Banner

अंतिम मुदत:25 जून २०२5

(उशिरा आलेल्या नोंदी स्वीकारल्या जाणार नाहीत)

प्रवेश फॉर्म लिंक :

🏆 बक्षिस:

प्रथम पारितोषिक :

₹ 11,000 आणि सन्मानचिन्ह

द्वितीय पारितोषिक :

₹ 5,000 आणि सन्मानचिन्ह

तृतीय पारितोषिक :

₹ 3,000 आणि सन्मानचिन्ह

अधिक माहितीसाठी संपर्क : देवा घाणेकर
फोन नंबर :+91 70660 81213

डॉक्युमेंटरी स्पर्धा नियम आणि अटी

    पात्रता :
  • स्पर्धा सर्व वयोगटातील आणि कोणत्याही अनुभवाच्या स्तरावरील फिल्म निर्मात्यांसाठी खुली आहे.
  • सबमिशन:
    • एक स्पर्धक जास्तीत जास्त दोन फिल्म्स पाठवू शकतो, मात्र प्रवेश फॉर्म दोन वेळा भरणे आवश्यक आहे.
    अंतिम मुदत:
  • २५ जून २०२५ (उशिरा आलेल्या नोंदी स्वीकारल्या जाणार नाहीत).
  • फिल्म ड्युरेशन:
  • स्पर्धेसाठी सादर केलेल्या डॉक्युमेंटरीच्या लांबी १५ मिनिटांपेक्षा जास्त नसावी.
  • ओरिजनल:
  • डॉक्युमेंटरी हे सबमिट करणाऱ्या फिल्म निर्मात्याने तयार केलेले मूळ कार्य असले पाहिजेत.
  • डॉक्युमेंटरीमध्ये वापरलेली कोणतीही कॉपीराइट केलेली सामग्री योग्यरित्या परवानाकृत आणि क्रेडिट केलेली असणे आवश्यक आहे.
  • कॉन्टेन्ट गाईडलाईन:
    • फिल्म केवळ सह्याद्री ह्या विषयाशी निगडित असावी.
    • आक्षेपार्ह किंवा अयोग्य विषयावरील फिल्म रिजेक्ट करण्याचा अधिकार परीक्षकांना असतील.
    निकष:
    • सादरीकरण, प्रोडक्शन क्वालिटी, ओरिजिनॅलिटी, क्रिएटिव्हिटी, टेक्निकल स्किल्स, इम्पॅक्ट, नाविन्यता आणि थीमशी सुसंगतता — या निकषांवर आधारित निवड.
    • विजेते ५-६ जुलै दरम्यान घोषित होतील.
    • नियमांचे पालन न केल्यास एंट्री अपात्र ठरू शकते.
    अधिकार आणि परवानग्या:
  • निवडलेल्या फिल्म्स ६ जुलै २०२५ ला संमेलनात प्रदर्शित होतील. कॉपीराइट फिल्म निर्मात्याचाच राहील.