सह्यमित्र फाउंडेशन

सुबक दर्जेदार स्मरणिका प्रकाशन

2025 - नाशिक - वर्ष ३ रे

!! बुकिंग सुरू !!

सह्याद्री स्मरणिका
"सह्याद्री रत्न"
स्मरणिका - एक अमूल्य दस्तावेज!
  • सह्याद्रीच्या कुशीतून उगम पावलेली, गिरीप्रेमींच्या आठवणी,
  • प्रेरक लेख, दुर्गांमध्ये दस्तावेज,
  • महाराष्ट्रातील दुर्गांचे वेगळेपण जागर करणारी खास स्मरणिका!

एडव्हान्स बुकिंग वर खास सवलत!

₹ 250/- प्रत्येक (मूळ किंमत ₹ 500/-)

ही ऑफर फक्त 25 जून 2025 पर्यंत मर्यादित आहे!

मर्यादित प्रती - आजच नोंदणी करा!

प्रवेश फॉर्म लिंक :

संपर्क: अभिजित अकोलकर - +91 70589 64243

ही स्मरणिका म्हणजे केवळ आठवणींचा संग्रह नाही, तर सह्याद्रीच्या शौर्याच्या दस्तावेज आहे!

🌿 स्मरणिका : सह्याद्री रत्न 🌿



शब्दांतील पर्वत... आठवणींचा शिखरवेल...

सह्याद्री म्हणजे नुसतं पाहणं नव्हे...
ते आहे जाणिवेचं आणि अनुभवांचं उंच शिखर.
त्या वाटा, त्या वाऱ्याच्या सावल्या, त्या गडकोटांचे साक्षीदार क्षण —
ज्यांनी आपल्या आयुष्यात एक नवा सूर निर्माण केला...

हे सूर शब्दांत बांधले, अनुभवांनी सजवले, आणि भावनेच्या रेशमी धाग्यांनी विणले,
तो अनमोल दस्तऐवज म्हणजेच ‘सह्याद्री रत्न’ — एक स्मरणगाथा, जी हृदयाशी जपावी अशी!

गेल्या दोन वर्षांपासून वाचकांच्या मनात आपले स्थान निर्माण करणारी ही स्मरणिका
या वर्षी आणखी समृद्ध, आणखी झळाळून येते आहे...
अनेक संवेदनशील भटक्यांच्या लेखणीतून उतरलेले विचार,
त्या प्रत्येक लेखामध्ये आहे – एक खोल साद... एक श्वास... आणि एक अनुभव.

साईराज बेलसरे यांची भानावलेली नजर,
रविंद्र अभ्यंकर सरांचं अभ्यासपूर्ण चिंतन,
डॉ. अमर आडके यांची धगधगती जिज्ञासा,
डॉ. संग्राम इंदोरे यांचं रसाळ भाष्य,
प्रिती पटेल यांचं निसर्गाशी असलेलं सख्य,
केतन पुरी,अमित मराठे,भूषण हर्षे,अर्चित गोखले, अमित निंबाळकर, अंबरीश मोरे, प्रांजल वाघ, मिलिंद देशपांडे, मनोज 
कापडे, स्वप्निल खोत, डॉ मंजिरी भालेराव,निखिल गोरे,विनय जोशी, महे
श शिरसाठ, योगेश भालेराव,सारंग मांडके, हेमंत पोखरणकर, महेश भालेराव,रवी बाविस्कर 
अभिजित अकोलकर, चिन्मय किर्तने इ.इ....
या साऱ्यांच्या लेखांनी ही स्मरणिका अक्षरशः ‘शब्दशिखर’ झाली आहे.

त्याचबरोबर, डोंगरांमध्ये हरवलेल्या प्रकाशाच्या किरणांना टिपणारी अद्वितीय छायाचित्रं —
जी पाहताना आपणही क्षणभर त्या शिखरावर पोहचल्यासारखं वाटतं...

ही स्मरणिका तुमच्यासाठी आहे ...!
ज्या सह्याद्रीने तुम्हाला जीवनाची दिशा दिली,
त्या सह्याद्रीच्या आठवणी जपणारी,
त्याच्या गंधाचा श्वास असलेली...

‘सह्याद्री रत्न’ – ही केवळ एक स्मरणिका नाही,
ती आहे तुमच्या मनातल्या सह्याद्रीची प्रतिकृती...

ती तुमच्या शेल्फवर नक्की असावी ...
कारण "सह्याद्री" केवळ पाहण्याची गोष्ट नाही...
तो जपण्याची गोष्ट आहे.

आपल्या सहृदय वाचनासाठी नम्र सादर...
_____________
आपलाच,
संपादक मंडळ
सह्याद्री रत्न