सह्यमित्र फाउंडेशन

कै. अविनाश जोशी स्मृतीप्रीत्यर्थ

सह्याद्री मित्र संमेलन 2025

वर्ष ३ रे नाशिक

दिनांक: ६ जुलै, २०२५ || स्थान: गुरुदक्षिणा सभागृह, कॉलेज रोड, नाशिक

अधिक वाचा

सह्याद्री मित्र संमेलन

नाशिक परिसरातील तमाम ट्रेकर्स मंडळींनी पुढाकार घेऊन 'सह्याद्री मित्र संमेलन नाशिक २०२५' आयोजित केले आहे. यंदा हे ३ रे वर्ष आहे. कै. जोशीकाकांच्या स्मृतींना उजाळा देणे व त्यानिमित्त विविध कार्यक्रम व पुरस्कार आयोजित करणे हा या समितीचा मूळ उद्देश आहे. नाशिककरांबरोबरच महाराष्ट्रातील सह्याद्री प्रेमी, निसर्गप्रेमी, सायकलिस्ट व ट्रेकर मंडळी यांना सामावून घेण्याचं स्वप्न बघून आम्ही ह्या कार्यक्रमाच्या तिसरा वर्षात पदार्पण करत आहोत. सह्याद्रीत भटकणा-यांसाठी आपलं स्वतःचं व्यासपीठ असावं. त्यावर आपल्या कलागुणांना सादर करण्याची संधी मिळावी आणि वर्षातून एकदा तरी आपण सर्व भटक्यांनी एकत्र यावं, भेटीगाठी व्हाव्यात आणि सह्याद्री जागर व्हावा. यासाठीचं… हे सह्याद्री मित्र संमेलन.

सह्याद्री मित्र संमेलन नाशिक

६ जुलै २०२५
सकाळी १०:०० वा. – संमेलनाचे औपचारिक उद्घाटन
गुरूदक्षिणा Auditorium, गोखले एज्युकेशन काॅलेज कॅम्पस, कॉलेज रोड, नाशिक.
मुख्य अतिथी:
  • मिलिंद गुणाजी (सिनेअभिनेता व 'भटकंती' फेम)
  • ग्रुप कॅप्टन श्री. जयकिशन सर (एव्हरेस्टवीर / माजी प्रिन्सिपॉल (HMI) हिमालयीन मॉउंटनीयरींग इन्स्टिट्यूट)
  • श्री.उमेश झिरपे (सह्याद्री रत्न पुरस्कार विजेते)
  • ॲड.नितिन ठाकरे सर (स्वागताध्यक्ष)
प्रमुख व्याख्याते:
  • प्रा. के. घाणेकर..सद्यस्थितीतली दुर्ग भ्रमंती
  • डॉ. प्रिती पटेल....सह्याद्रीचे अंतरंग
  • डॉ. गुरुदास नूलकर....मिशन सह्याद्री
  • मकरंद केतकर .. गुढरम्य वन्यजीवन
  • केतन पुरी... महाराष्ट्राची कुलकथा
परिसंवाद – साहस, स्वप्नं आणि सह्याद्री
  • परिषद १: 'हिमालय ते सह्याद्री – स्त्रीसाहसाचा प्रवास'
    सहभागी – समीर वर्मा, प्रियंका मोहिते, मनीषा वाघमारे, प्राजक्ता घोडे
  • परिषद २: 'हिमालयीन मोहिमांची तयारी'
    सहभागी – अंकित जोशी, मिलिंद भिड़े, डॉ. रघुनाथ गोडबोले
पुरस्कार विजेते
  • विशेष उल्लेखनीय पुरस्कार
  • इतर पुरस्कार व स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ
  • गडकोटवेड्या मनांना सलाम!

संवेेदनांचा, प्रेरणेचा आणि निसर्गभिमाचा उत्सव – एक सुंदर अध्यायाची सांगता...

पहिलं सह्याद्री मित्र संमेलन

नाशिक, महाराष्ट्र
संमेलनाची मुख्य आकर्षणं
  • नाशिकच्या लेखकांनी घेतलेले पठकथाचं ध्वनिक्षेपणाची सादरीकरण
  • एनसीसी/एनएसएस चालवलेल्या विद्यार्थ्यांसाठी सह्याद्री गीत सादरीकरण
  • काही नवोदित विद्यार्थ्यांचं विद्यार्थ्यांच्या आतल्या दृष्टिकोनांचं दर्शन
  • हरीश कापाडिया
  • सह्याद्री टेल लायब्ररीचं प्रकाशन
  • विविध पुरस्कार वितरण सोहळा
पुरस्कार विजेते
  • सह्याद्री रत्न
    हरीश कापाडिया
  • वर्षातील ट्रेकर
    नितीन मोरेंदे
  • वर्षातील वटवट्या
    कामलू पोखळा
  • वर्षातील बचाव पथक
    बा. रायगड
  • विशेष उल्लेखनीय पुरस्कार
    विविध पुरस्कार वितरण सोहळा
    • अ. महाजन बंधू – एव्हरेस्ट विजेते
    • ब. नाशिक क्लाइंबर्स अ‍ॅन्ड रेस्क्यूअर्स असोसिएशन
    • क. चक्रं हायकर्स
कार्यक्रमाचे ठिकाण

दुपारी ४ वाजता सुरू झालेल्या या अर्धा दिवसाच्या संमेलनाची सुरुवात नाशिकच्या सिंहगर्जना ढोल पथकाने धुमधडाक्यात केली. प्रितम भामरे यांच्या अचाट ढोलवादनानंतर एक्सपालियर शाळेच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र गीत गाऊन सभागृहातील सर्वांना भारावून टाकले.

अध्यक्ष रंगराव आण्णा पाटील, प्रमुख पाहुणे आनंद पाळंदे, जेष्ठ गिर्यारोहक श्रीमती उषा प्रभा पागे आणि सह्याद्री रत्न पुरस्कारार्थी श्री. हरिश कपाडिया सर यांच्या हस्ते दिपप्रज्वलन झाले

कै. अविनाश जोशी यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आयोजित या संमेलनात त्यांच्या जीवनावर आधारित फिल्म दाखविण्यात आली. श्री. हरिश कपाडिया सरांच्या सह्याद्री भटकंतीवरील भाषणाने संमेलन संपले आणि सर्व उपस्थित सह्याद्री प्रेमी आनंदाचे भाव घेऊन परतले.